व्हॉटस् अ‍ॅपचे नवे फीचर्स सादर

बुधवार, 10 जानेवारी 2018 (11:07 IST)

व्हॉटस् अ‍ॅपने नवे फीचर्स सादर केले आहेत. यात व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगदरम्यान ‘स्विच’चे बटन, नवीन स्टिकर आयकॉन आदींचा समावेश आहे. अँड्रॉईडच्या 2.17.433 या बिटा व्हर्जनसाठी हे फीचर्स सध्या उपलब्ध आहेत. फेसबुकसारखे स्टिकर आयकॉन व्हॉट्सअ‍ॅपवरही दिसेल.

याशिवाय ‘शो ऑल काँटॅक्ट’चा टॅबही व्हॉट्सअ‍ॅपने काढून टाकल्याची माहिती ‘वाबेटेल इन्फो’ने दिली आहे. व्हॉईस कॉल आणि व्हिडीओ कॉल स्विच करण्यात येणार आहे. या नव्या फीचरमुळे कॉल सुरू असताना व्हॉईस कॉल की व्हिडीओ कॉल, असा पर्याय उपलब्ध होईल

याशिवाय व्हॉईस मेसेजसाठी व्हॉटस् अ‍ॅप एक नवे फीचर आणत आहे. फोन कॉल सुरू असताना किंवा संपल्यावर एक ऑप्शन यूजरसमोर येईल. कॉलवर बोलायचे किंवा कॉल रेकॉर्ड करायचा याची निवड यूजरला करता येणार आहे. त्यामुळे रेकॉर्ड झालेला व्हॉईस कॉल नंतरही ऐकता येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती