Mitron App पुन्हा एकदा Google Play स्टोअरवर

रविवार, 7 जून 2020 (09:07 IST)
Mitron App आता पुन्हा एकदा Google Play स्टोअरवर उपलब्ध झालं आहे. याआधी गुगलने प्ले स्टोअरवरुन काही दिवसांपूर्वी हटवले होते. गुगलच्या पॉलिसीचं उल्लंघन केल्यामुळे हे अ‍ॅप हटवण्यात आलं होतं. पण, त्यानंतर गुगल या अ‍ॅप्लिकेशनच्या डेव्हलपर्ससोबत समस्या ‘फिक्स’ करण्यावर काम करत असल्याचं वृत्त आलं होतं आणि आता या अ‍ॅपचं प्ले स्टोअरवर आहे.
 
Mitron App हे लाँचिंगनंतर काही दिवसांमध्येच 50 लाखांहून अधिक युजर्सनी हे अ‍ॅप फोनमध्ये डाउनलोड केलं होतं. पण, त्यानंतर 2 जून रोजी गुगलने हे अ‍ॅप प्लेस्टोअरवरुन हटवलं. त्यावेळी, ‘कोणतेही बदल न करता दुसऱ्या अ‍ॅपचे फीचर्स आणि कंटेंट कॉपी करणं गुगलच्या नियमांचं उल्लंघन आहे. Google Play वर आधीपासून उपलब्ध असलेल्या अ‍ॅपप्रमाणेच एखादं अ‍ॅप युजर्सना अनुभव आणि फीचर देत असेल तर आम्ही अशा अ‍ॅप्सना परवानगी देत नाही. अ‍ॅप्सनी अनोख्या फीचर्स आणि सर्व्हिसद्वारे युजर्सना चांगला अनुभव द्यायला हवा’, असं गुगलने म्हटलं होतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती