जिओचे हायस्पीड ब्रॉडबँड लवकरच होणार लाँच

सोमवार, 24 जुलै 2017 (08:01 IST)
रिलायन्स जिओचा बहुप्रतीक्षित  व्हॉईस कमांडिंग 4G फीचर फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी या फोनची घोषणा केली. दरम्यान, अंबानींनी मोस्ट अवेटेड सर्व्हिस FTTH ब्रॉडबँडबाबतही मोठी घोषणा केली. त्यामुळे जिओचे हायस्पीड ब्रॉडबँड लवकरच लाँच होणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
हायस्पीड ब्रॉडबँडवर जिओचे  काम सुरु आहे, जी लवकरच लाँच केली जाणार आहे. फिक्स लाईन हायस्पीड इंटरनेटमुळे देशाच्या प्रगतीला आणखी वेग येणार आहे. जिओकडून कार्यालये, व्यवसाय आणि वैयक्तिक वापरासाठी जागतिक दर्जाची फायबर कनेक्टिव्हीटी दिली जाईल. हे जिओचे पुढचे पाऊल असेल, अशी माहिती अंबानींनी दिली. जिओच्या फायबर टू द होम म्हणजेच FTTH या सर्व्हिची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. अनेक मोठ्या शहरांमध्ये या सेवेची चाचणीही सुरु केली असल्याची माहिती आहे. शिवाय या सेवेच्या टॅरिफ प्लॅनचीही माहिती समोर आली होती.

वेबदुनिया वर वाचा