रिलायन्स जिओने डाऊनलोड स्पीडमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. भारतातील इतर टेलिकॉम कंपन्यांच्या डाऊनलोड स्पीडला मागे टाकत बाजी मारली आहे. ट्राय’च्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यात जिओ नेटवर्कचा डाऊनलोड स्पीड प्रति सेकंद 18.16 Mbps होता. ट्राय दर महिन्याला इंटरनेट स्पीडची आकडेवारी जाहीर करते. जिओसोबत व्होडाफोनचा इंटरनेट स्पीडही वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये व्होडाफोनचा इंटरनेट स्पीड 4.9 Mbps होता, तर त्यात वाढ होऊन डिसेंबरमध्ये 6.7Mbps एवढा झाला आहे.