आयआरसीटीसीकडून मोबाईल अॅप लाँचची तयारी

बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (20:34 IST)

आता रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. यामुळे तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होईल. 

जर रेल्वे गाडी उशिरा येणार असेल किंवा वेळेवर नसेल तर याची माहिती प्रवाशांना देण्यासाठी खास अॅलर्ट सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रवासाच्यावेळी स्टेशनवर गाडीच्या वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यासाठी एक अॅलर्ट पाठविले जाईल.  रेल्वे ही नवी यंत्रणा सुरु करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) च्या मदतीने उपग्रहाची मदत घेणार आहे. त्यामुळे प्रवाशांना उपग्रहाद्वारे रेल्वेचे प्रत्यक्ष स्थान सांगता येणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती