इन्फोसिसचे यांत्रिकीकरण, ९ हजार लोकांनी गमावल्या नोकर्‍या

देशातील सर्वात मोठी आणि महत्वाची असलेल्या आयटी कंपनी इन्फोसिसनं आपल्या आठ ते नऊ हजार कर्मचार्‍यांना कामावरुन कमी केलं आहे. मागील एक वर्षापासून कर्माचार्‍यांची कपात इन्फोसिसकडून केली जात असल्याचं कंपनीचे मुख्य एचआर कृष्णमूर्ती शंकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. तर अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
 
यावर मात्र कंपनीने कारण दिले आहे. टप्प्याटप्प्यानं 2 हजार कर्मचाऱ्यांना कमी करत आतापर्यंत 8000 ते 9000 कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आलं आहे. नवीन ठिकाणी काम करण्यासाठी विशेष ट्रेनिंगही देण्यात येत आहे, असं कृष्णमूर्ती यांनी सांगितलं आहे.  ऑटोमेशनमुळे कामावरील माणसांची संख्या कमी होत असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच सध्या नोकरभरतीही थांबवण्यात आल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात आता असे काम निवडावे लागेल जिथे आपले काम यंत्र करणार नाही नाहीतर बेरोजगार होण्याची वेळ येवू शकते.

वेबदुनिया वर वाचा