ग्लोबल सायबर सिक्युरिटी इंडेक्समध्ये भारत टॉप 10 मध्ये

बुधवार, 30 जून 2021 (13:54 IST)
आयटीयू के जागतिक सायबर सुरक्षा सूचकांक (GCI) 2020 मध्ये भारत 37 स्थानांनी वर येत शीर्ष 10 मध्ये स्थान मिवळवले आहे. महत्त्वाच्या सायबर सिक्युरिटी पॅरामीटर्समध्ये भारताला जगात दहावा क्रमांक मिळाला आहे. डिजिटल इंडियाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त 1 जुलैच्या निमित्ताने सायबर सुरक्षेबाबत भारताच्या प्रयत्नांना संयुक्त राष्ट्र संघटनेने एका दिवसापूर्वी मान्यता दिली.
 
भारत जागतिक आयटी महासत्ता म्हणून उदयास येत आहे आणि डेटा गोपनीयता व नागरिकांच्या ऑनलाईन हक्कांच्या संरक्षणासाठी ठोस उपायांसह डिजिटल सार्वभौमत्वाचे प्रतिपादन करतं.
 
आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघ (ITU) द्वारे 29 जून 2021 रोजी सुरु करण्यात आलेल्या जागतिक सायबर सुरक्षा सूचकांक 2020 मध्ये भारताने 10 व्या स्थानावर असून 37 स्थानांनी क्रम सुधारले गेले.
 
सायबर सुरक्षेच्या बाबतीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर असून त्याखालोखाल यूके आणि सौदी अरेबिया दुसर्‍या स्थानावर आहेत तर निर्देशांकात एस्टोनिया तिसर्‍या स्थानावर आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती