‘गूगल’ वर श्रीदेवी नावाचा 10 लाखांपर्यंत सर्च

मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:34 IST)

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांच्या आकस्मात मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर श्रीदेवी यांच्याबद्दल अधिक महिती जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याच चाहत्यांना लागली आणि अर्थात ‘गूगल’ची मदत घेतली गेली.


रविवारी दुपारी 12 वाजेपर्यंत गूगलवर ‘Sridevi/श्रीदेवी’ ही नावं 10 लाखांपर्यंत सर्च केले गेले. दुपारी 4 वाजता 'श्रीदेवी' नावाच्या सर्चचा आकडा 50 लाखांवर गेला, त्यानंतर संध्याकाळी 6 वाजल्यानंतर एक कोटींचा टप्पा पार केला. 

श्रीदेवी या मूळच्या दक्षिण भारतातल्या असल्याने, त्यांच्या नावाने फेसबुकवर सर्च करण्यात दक्षिण भारतातील यूझर्सची संख्या मोठी होती. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि ओदिशा या राज्यांमधील यूझर्सनी सर्वाधिक वेळा ‘श्रीदेवी’ यांचं नाव गूगलवर सर्च केले. उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यातील यूझर्सनी श्रीदेवी यांचं नाव फारसं गूगलवर सर्च केले नाही, अशी आकडेवारी सांगते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती