खास दुचाकीस्वारांसाठी गुगलचे 'मॅप अॅप'

मंगळवार, 12 डिसेंबर 2017 (15:10 IST)

रस्त्यावरून गाडी चालवताना वाहतूक कोंडीने आपण सर्वचजण हैराण होतो. चारचाकी गाड्यांची रस्त्यांवर रांगच रांग लागली असताना दुचाकीवाले मात्र, छोट्याशा जागेतून पुढे पुढे जाताना दिसतात.  आता गुगल एक मॅप अॅप लॉंच करणार असून, या अॅपद्वारे दुचाकीस्वारांना शार्टकट रूट शोधणे सोपे जाणार आहे. मॅप अॅपमुळे दुचाकीस्वारांचे काम आणखी सोपे होणार असून, त्यांना वाहतूक कोंडीतून सुटण्याचा आणखी एक सोपा आणि वेळ वाचवणारा मार्ग सापडणार आहे.

गुगल मॅपचे हे फिचर अॅप अँड्रॉईड व्हर्जन v9.67.1 युक्त आहे. जर तुम्हाला तुमच्या गुगल मॅप मध्ये हे फिचर दिसत नसेल तर, तुमच्या गुगल मॅपला अपडेट करा. गुगलने या फीचरला मोटरसायकल मोड असे नाव दिले आहे. अपडेट होताच हे अॅप तुम्हाला योग्य ते 'मार्ग'दर्शन करेन.

अॅप ओपन करताच तुमचे सध्याचे लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला ज्या ठिकाणी जायचे आहे ते लोकेशन सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाल कार, बाईक, बस आणि पादचारी असे ऑप्शन दिसतील. त्यापैकी, बाईक मोड सिलेक्ट करा. तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती