आता व्हाट्सएप आणि टेलीग्रॅमचे मेसेज वाचून दाखवेल गूगल असिस्टेंट

गुरूवार, 8 ऑगस्ट 2019 (13:05 IST)
गूगलने आपले वर्च्युअल असिस्टेंट गूगल असिस्टेंटला घेऊन नवीन ऍलन केला आहे. गूगल असिस्टेंट आता व्हाट्सएप आणि टेलीग्रॅमचे मेसेज देखील तुम्हाला वाचून सांगेल. यासाठी तुम्हाला फक्त एक कमांड द्यावी लागणार आहे. सांगायचे म्हणजे की गूगल असिस्टेंट आतापर्यंत मोबाइल फोनवर येणारे मेसेज आणि हँगआउट मेसेजलाच वाचून दाखवत होता.
 
गूगल असिस्टेंटच्या नवीन अपडेटनंतर यूजर बोलून मेसेजचा रिप्लाई देखील करू शकतील. महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या फक्त म्हटल्याने गूगल असिस्टेंट कोणाचेही नंबर ब्लॉकपण करू शकतो.
 
व्हाट्सएप आणि टेलीग्रामचे मेसेज वाचल्यानंतर गूगल असिस्टेंट हे देखील सांगेल की मेसेजसोबत फोटो, व्हिडिओ किंवा एखादी फाइल अटँच आहे की नाही, तसेच गूगल असिस्टेंट फोटो, व्हिडिओ आणि फाइलला ना तर ओपन करेल नाही डाउनलोड.
 
जर यूजरला हवे असेल तर तो गूगल असिस्टेंटला 'रीड माय मेसेज' वॉयस कमांड देऊन मेसेज वाचवू शकतो. गूगल असिस्टेंटचा हा फीचर त्या लोकांसाठी फारच फायद्याचा साबीत होईल जे नेहमी ड्राइविंग करत असतात. गूगलचा हा फीचर इंग्रजीसमेत बर्‍याच भाषांमध्ये काम करणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती