ग्लोबल इंटरनेट डाउन झाल्याने जगातील बर्याच मोठ्या वेबसाइट्स क्रॅश झाल्याची नोंद आहे. या अहवालानुसार Reddit, Spotify, Twitch, Stack Overflow, GitHub, gov.uk, द गर्जियन, न्यूयॉर्क टाइम्स, बीबीसी, फायनान्शियल टाईम्स यासारख्या अनेक वेबसाइट्स बंद पडल्या आहे.
या आउटेजबद्दल अद्याप कोणतीही अचूक माहिती नाही, परंतु सामान्यत: इंटरनेट सेवा प्रदात्याद्वारे या प्रकारची आउटेज येते. बर्याच अहवालात असेही म्हटले जात आहे की कन्टेन्ट डिलिव्हरी नेटवर्क (सीडीएन) च्या जागतिक बंदमुळे ही समस्या उद्भवली आहे.द न्यूयार्क टाइम्स,वाशिंग्टन पोस्ट,वॉल स्ट्रीट जर्नल या वेबसाईट्सवर गेल्यावर 503 एरर दाखवत आहे.