जियोची उत्तम योजना, 154 रुपये कमी देऊन दररोज 56 दिवसांची वैधता आणि 2 जीबी डेटा मिळवा

सोमवार, 22 मार्च 2021 (18:27 IST)
देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांना 2  जीबी डेटा सह अनेक प्लान देतो. वेगवेगळ्या किमतीसह असलेल्या या प्लानमध्ये  28 दिवस ते 365 दिवसांची वैधता मिळते. अशा परिस्थितीत स्वतःसाठी प्लानची निवड करणे अवघड होते. आज आम्ही आपल्याला जिओ च्या अशा प्लान बद्दल सांगत आहोत या मध्ये आपल्याला 154 रुपये कमी आकारावे लागणार. समान डेटा आणि वैधता  मिळेल. 
 
आता जिओच्या सर्व प्लान मध्ये अमर्यादित कॉल एसएमएस प्रदान केले आहेत. अशा परिस्थितीत डेटा आणि वैधता पाहून आपल्याला प्लान ची निवड करायची आहे. जर आपण जीओचा दररोजचा 2GB डेटा प्लान शोधत असाल (jio 2gb दररोज योजना)तर आपण 444 आणि 598 रुपयांच्या प्रीपेड प्लान कडे बघितले असणार. आज आम्ही आपल्याला या दोन्ही योजनांची तुलना करून सांगणार आहोत. की आपल्यासाठी कोणता प्लान अधिक चांगला आहे. 
 
 Jio चा 444 रुपयांचा प्लान-
रिलायन्स जिओचा 444 रुपयांचा प्लान दररोज 2 जीबी डेटासह येतो.याची वैधता 56 दिवसाची आहे. या मध्ये वापरकर्त्यांना एकूण 112 जीबी डेटा मिळतो .डेटासह सर्व नेटवर्कवर दररोज अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएसदेखील दिले जाते. या प्लान मध्ये जिओ टीव्ही आणि जिओ सिनेमा सारख्या जिओ 
वरील अ‍ॅप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन दिले जाते. या शिवाय इतर फायदे मिळतात. 
 
जिओचा  598 रुपयांचा प्लान- 
जिओचा  598 रुपयांचा प्लान वापरकर्त्यांना दररोज 2 जीबी डेटा आणि 56 दिवसांची वैधता देतो. अशा प्रकारे एकूण डेटा 112 जीबी मिळतो. या मध्ये अनलिमिटेड कॉलिंग दररोजचे 100 एसएमएस आणि जिओ अ‍ॅप्सचे फ्री सब्स्क्रिप्शन दिले जाते.या प्लानचे वैशिष्टये असे की या प्लान मध्ये 1 वर्षासाठी  डिस्ने(disney)+हॉटस्टार(hotstar)चे सब्स्क्रिप्शन देखील दिले जाते. 
 
कोणत्या प्लान मध्ये किती फायदा -
रिलायन्स जिओ च्या 598 रुपये आणि  444 रुपयांच्या प्लान मध्ये समान वैधता (56 दिवसांची )मिळते. तसेच देता देखील समानच (112 जीबी )मिळतो.या मध्ये सर्वात मोठा फरक म्हणजे डिस्ने +हॉटस्टारचे सब्स्क्रिप्शन जे 598 रुपयांच्या प्लान मध्ये दिले जाते. हे 444 रुपयांच्या प्लान मध्ये दिलेले नाही. जर आपणास ही मेम्बरशिप नको असेल तर आपण आपले 154 रुपये वाचवू शकता आणि 444 रुपयांचा प्लान घेऊ शकता.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती