काँग्रेस पक्षाशी संबंधित 687 पेज फेसबुकने बंद केली आहेत. तसेच पाकिस्तानी सैन्याच्या कर्मचाऱ्यांशी संबंधित 103 फेसबुक खातीही डिलीट करण्यात आली आहेत. फेसबुकने या कारवाईबाबत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेसबुकने अशी कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. फेसबुकने म्हटले आहे की, पेजवरील गैरव्यवहारांमुळे देशातील प्रमुख विरोधी पक्षाशी संबंधित पेजेस बंद करण्यात आली आहेत. फेसबुकने इन्स्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही प्लॅटफॉर्मवर ही कारवाई केली आहे.
फेसबुकने ही कारवाई करताना म्हटले आहे की, लोकांनी बनावट खाती काढून वेगवेगळ्या ग्रुपमध्ये जोडून घेऊन संपर्क वाढवले. या बनावट खात्यांवरून स्थानिक बातम्यांबरोरच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बदनामी करणारे संदेशही टाकण्यात येत होते. त्यामुळी हे पेजेस बंद करण्यात आल्याचे फेसबुकने सांगितले.