व्हाटसअॅपपेक्षा ही सिस्टीम वेगळी असणार आहे. यात पीअर-टू-पीअर म्हणजेच वैयक्तीक पातळीवरून पैशांची देवाण-घेवाण करता येणार असून याच्या जोडीला पीअर-टू-मर्चंट म्हणजेच व्यावसायिक व्यवहारदेखील करता येतील. सध्या ही सेवा बीटा अर्थात प्रयोगात्मक अवस्थेत देण्यात आलेली असून निवडक युजर्सच्या माध्यमातून याची चाचणी घेतली जात आहे. याच्या पहिल्या टप्प्यात मोबाईल रिचार्जची सुविधा देण्यात आलेली आहे. ही चाचणी झाल्यानंतर याला अधिकृतपणे भारतीय युजर्ससाठी सादर करण्यात येणार आहे.