कंपनी सध्या आपल्या वापरकर्त्यांसाठी फेसबुक अॅप, मेसेंजर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, वर्कप्लेस आणि कॅलिब्रा (डिजिटल करन्सी लिब्रा प्रोजेक्ट) यासारख्या सेवा देत आहे. या व्यतिरिक्त, कंपनी लवकरच नवीन लोगो आणि अधिकृत वेबसाइटसह बाजारात नवीन उत्पादने बाजारात आणणार आहे.
फेसबुकचे म्हणणे आहे की आम्ही हा लोगो खास कस्टम टायपोग्राफीने तयार केला आहे, जो कंपनी आणि अॅपमधील फरक दर्शवेल. वापरकर्ते आमच्याशी थेट वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर, फेसबुकची ही पायरी अधिकाधिक वापरकर्त्यांना कनेक्ट करण्यात सक्षम करेल.