फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क झुकरबर्ग

गुरूवार, 22 मार्च 2018 (15:57 IST)

मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज अॅनालिटिकाच्या डेटा लीक प्रकरणावर फेसबुकने पहिल्यांदाच अधिकृत भाष्य केले आहे. फेसबुकचे सह-संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या हातून चूक घडली, अशी कबुली दिली आहे. फेसबुकच्या अंदाजे पाच कोटी युजर्सच्या खासगी माहितीचा गैरवापर करून केंब्रिज अॅनालेटिकाने 2016च्या निवडणुकीवर प्रभाव टाकला, असा आरोप ठेवण्यात आला आहे.याप्रकरणी झुकरबर्ग यांनी पहिल्यांदाच मौन सोडले व ते म्हणाले, फेसबुकवर असे अनेक अॅप्स आहेत ज्याद्वारे युजर्सची माहिती त्या अॅप बनवणाऱ्यांना मिळते. अशा अॅप्सला चाप बसवण्यासाठी कठोर पावले उचलू. तुमच्या डेटाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. जर आम्ही त्याचं संरक्षण करू शकलो नाही तर तुम्हाला सेवा देण्यास आम्ही पात्र नाही, असं समजू. मी फेसबुकची स्थापना केली, म्हणून या प्लॅटफॉर्मवर जे काही होईल, त्यासाठी मी जबाबदार आहे. या आगोदर आता सोशल मिडीयावर फेसबुक काढून टाका असा मेसेज फिरत असून लाखो लोकांनी फेसबुक बंद अथवा खाते खोडून टाकले आहे. तर फेसबुकचे मोठे आर्थिक नुकसान समोर आले असून त्यांचा शेअर सुद्धा पडला आहे. मार्क झुकरबर्ग ने आगोदर सुद्धा अनेकदा चुका केल्या आहेत. त्यामुळे वापरकर्ते चिडले आहे. तर भारतातील अनेक राजकीय पक्षांना सुद्धा असा डेटा विकला गेला होता. त्यावर आता कोन्ग्रेस आणि भाजपात आरोप सुरु झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती