युरोपात 'Facebook'ला ७८८ कोटींचा दंड

शुक्रवार, 19 मे 2017 (11:06 IST)
जगप्रसिद्ध सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ असलेल्या फेसबुकला दररोज नवनवीन न्यायालयीन अडचणींना तोंड द्यावे लागत असुन एका ताज्या प्रकरणात युरोपियन आयोगाने फेसबुकला तब्बल ११ कोटी युरो म्हणजेच जवळपास ७८८ कोटींचा दंड ठोठावला आहे. व्हाटस्अँप सोबतच्या कराराबद्दल दिशाभूल करणारी माहिती सादर केल्याप्रकरणी फेसबुकला हा दंड ठोठावण्यात आला आहे.
 
कंपन्यांनी युरोपियन संघाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असा स्पष्ट संदेश आजच्या निर्णयातून जात असल्याचे युरोपियन संघ स्पर्धात्मक आयोगाच्या आयुक्त मार्गाथ्रे वेस्तागर म्हणाल्या. फेसबूकने यावर प्रतिक्रिया देताना आयोगासोबत सहकार्य केल्याचे सांगत संबंधित चूक अनवधानाने झाल्याचे म्हटले आहे. आम्ही आयोगासोबतच्या पहिल्या चर्चेपासून अत्यंत चांगल्या पद्धतीने सहकार्य केले आणि प्रत्येकवेळी अचूक माहिती सादर केल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले. २0१४ तील निष्कर्षांसंबंधी झालेल्या चूका हेतूपूर्वक केल्या नसून यामुळे कंपन्यांच्या विलिनीकरणानंतरच्या प्रक्रियेवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे आयोगाने स्पष्ट केल्याचे फेसबुकने म्हटले होते. 

वेबदुनिया वर वाचा