२०१६ या वर्षात देशात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ही सुमारे ४.२ कोटींनी वाढली. चीनच्या एकूण लोकसंख्येपैकी ५३.२ % नागरिक आता इंटरनेट वापरत असल्याचे या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. स्मार्टफोन्सचा प्रचंड प्रमाणात वाढलेला वापर, हे एकंदर इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढण्यामागील एक प्रमुख कारण असल्याचे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील शांघायमधील तज्ज्ञ ली यी यांनी सांगितले.
इंटरनेट वापरणाऱ्या नागरिकांमध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांचे प्रमाण ९५.१ इतके प्रचंड असल्याचे आढळून आले आहे. २०१५मध्ये हे प्रमाण ९०.१ % इतके होते. याचबरोबर, इंटरनेटच्या माध्यमातूनच आर्थिक व्यवहार करणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ३१.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चीनमध्ये स्मार्टफोन्स व इंटरनेटच्या माध्यमामधून आर्थिक व्यवहार केलेल्या नागरिकांची संख्या ४६.९ कोटी इतकी असल्याचे निष्पन्न झाले आहे. डाऊनलोड करण्यात आलेल्या “ऍप्स’मध्ये ऑनलाईन म्युझिक व व्हिडिओ, ऑनलाईन पेमेंट्ससंदर्भातील मोबाईल ऍप्लिकेशन्सचे प्रमाण सर्वाधिक आहे.