मोबाईल बदला, अपडेट करा, अन्यथा व्हॉट्सअॅप चालणार नाही

मंगळवार, 19 जून 2018 (15:22 IST)
या वर्षअखेर काही स्मार्टफोन्सवर व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही. आऊटडेटेज व्हर्जनला 2019 पासून व्हॉट्सअॅप सपोर्ट करणार नाही. 31 डिसेंबर 2018 नंतर व्हॉट्सअॅप वापरायचं असेल, तर कंपनीने लिस्ट केलेले फोन बदलावे लागणार आहेत. व्हॉट्सअॅप नव्याने जी फीचर्स आणणार आहे, त्यांना जुन्या व्हर्जन्सवर सपोर्ट मिळणार नाही. जुनं अँड्रॉईड व्हर्जन वापरत असाल, तर ते अद्ययावत करुन घेण्याचा सल्ला व्हॉट्सअॅपने दिला आहे.
 
या फोनवर व्हॉट्सअॅप चालणार नाही
 
नोकिया S40 (31 डिसेंबर 2018 नंतर चालणार नाही)
अँड्रॉईड 2.3.7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स (1 फेब्रुवारी 2020 नंतर चालणार नाही)
आयफोन iOS 7 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स (1 फेब्रुवारी 2020 नंतर चालणार नाही)
 
या फोनवर व्हॉट्सअॅप चालत नाही
 
अँड्रॉईड 2.3.3 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
विंडोज फोन 8.0 आणि यापेक्षा जुने व्हर्जन्स
आयफोन 3GS/iOS 6
नोकिया सिम्बियन S60
ब्लॅकबेरी ओएस आणि ब्लॅकबेरी 10
 
31 डिसेंबरनंतर या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार!
 
या व्हर्जनला अपग्रेड करा
 
अँड्रॉईड 4.0 किंवा त्यापुढे
आयफोन iOS 8 किंवा त्यापुढे
विंडोज 8.1 किंवा त्यापुढे

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती