भारताच्या कॉम्प्यूटर इमरजेंसी रिस्पांस टीम आणि राष्ट्रीय सायबर-सुरक्षा एजेंसीने जूमच्या सिक्योरिटीबद्दल लोकांना सतर्क केलं आहे. CERT-In ने म्हटले आहे जूम अॅप सायबर हल्ल्याचं कारण बनू शकतं. या अॅपद्वारे सायबर गुन्हेगार शासकीय आणि खाजगी कार्यालयांतून डेटा चोरी करुन चुकीचा वापर करु शकतात. सीईआरटीने म्हटले की जूम अॅपसह डेटा लीक होण्याचा धोका आहे. एजेंसीने सल्ला दिला आहे की जूम अॅप वापरुन आधी अॅप अप-टू-डेट ठेवा आणि मजबूत पासवर्ड ठेवा. या व्यतिरिक्त अॅपमध्ये वेटिंग फीचर ऑन ठेवा ज्याने मीटिंगमध्ये भाग घेणार्या लोकांवर नियंत्रण ठेवता येऊ शकता.
जूमच्या सीईओ एरिक एस युआन यांनी एक ब्लॉगद्वारे सांगितले की डिसेंबर 2019 मध्ये जूमचे डेली अॅक्टिव यूजर्सची संख्या 10 मिलियन अर्थात एक कोटी होती. आता 2020 मध्ये 200 मिलियन म्हणजे 20 कोटी झाल आहे. त्यांनी सांगितले की महामारीमुळे जगभरातील 20 देशांचे 90,000 हून अधिक स्कूल्स देखील जूम अॅप वापरत आहे.