‘न्यूयॉर्क पोस्ट’,’यूपीआय’चे ट्विटर अकाउंट हॅक

बुधवार, 21 जानेवारी 2015 (13:12 IST)
अमेरिकेतील ‘द न्यूॉर्क पोस्ट’ आणि ‘यूनाइटेड प्रेस इंटरनॅशनल’ (यूपीआय) चं ट्विटर अकाउंट हॅकर्सनी हॅक केलं आहे आणि त्यावरून ते आर्थिक तसंच सेनेशी संबंधित खोटी माहिती ट्विट करत आहेत.
 
‘द न्यूॉर्क पोस्ट’नं आपलं ट्विटर अकाउंट हॅक झाल्याचं सांगताच वॉशिंग्टनमधील ‘यूपीआय’चं ट्विटर अकाउंट तसंच समाचार वेबसाइट दोन्ही हॅक झाल्याचं सांगितलंय.
 
‘न्यूयॉर्क पोस्ट’मधील ट्विटर अकाउंटमधून हॅकरनं खोटे ट्विट केले आहे की, दक्षिण चीन समुद्रात अमेरिका तसंच चीनच्या नौसेनेमध्ये युद्ध सुरू आहे.
 
तसंच ‘यूपीआय’च्या ट्विटर अकाउंटवरून एक सणसणीत खोटं ट्विट केलं आहे की, पोप फ्रांसिसनं घोषणा केली आहे की, ‘तिसरं विश्वयुद्ध सुरू झालंय’. द न्यूयॉर्क पोस्ट तसंच यूपीआय या हॅकर्सचा शोध घेत आहे.
 
आठवडय़ाभरापूर्वी अमेरिकी सैन्याचं ट्विटर अकाउंट हॅक केलं होतं. हॅकर्सनी स्वत:ला इस्लामिक स्टेट (आईएस)चे असल्याचं सांगितलं आहे.

वेबदुनिया वर वाचा