चारशे रेल्वेस्थानकांवर मोफत वायफाय!

रेल्वे प्रवाशांना इंटरनेट सुविधा पुरवण्यासाठी सुरुवातीला देशातील 400 रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे.
 
देशातील रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. गुगल इंडिया लवकरच भारतातील 400 रेल्वे स्थानकांवर मोफत हायस्पीड वायफाय सुविधा पुरवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘डिजीटल इंडिया मिशन’च्या अंतर्गत हा प्रकल्प रेल्वे मंत्रालय आणि गुगल इंडिया हाती घेणार आहे.
 
गुगल इंडिया आणि रेल्वे मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नाने सुरू होणार्‍या या प्रकल्पात गुगल फायबर प्रोजेक्टचा वापर केला जाणार आहे. गुगल फायबर प्रोजेक्ट अमेरिकेतील सर्वात वेगवान ब्रॉडबँड सेवा देते.
 
‘प्रोजेक्ट निलगिरी’ या नावाने हा प्रकल्प गुगल इंडिया आणि रेल्वे मंत्रालय देशभर राबवणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा