सुनील नरेनचा मोठा पराक्रम,मलिंगाला पराभूत करून नंबर-1 बनला

मंगळवार, 30 एप्रिल 2024 (08:11 IST)
IPL 2024 चा 47 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला ,या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला,केकेआरचा महान खेळाडू सुनील नरेनने या सामन्यात अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम लसिथ मलिंगाच्या नावावर होता. 

सुनील नरेनने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 4 षटकात केवळ 24 धावा दिल्या आणि 1 बळी घेतला. केकेआर संघाचे घरचे मैदान असलेल्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर त्याची ही 69वी आयपीएल विकेट होती. यासह तो आयपीएलमध्ये एका ठिकाणी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी या यादीत लसिथ मलिंगा आघाडीवर होता. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर लसिथ मलिंगाने 68 विकेट्स घेतल्या. आयपीएलमध्ये एका ठिकाणी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज 69 विकेट्स - सुनील नरेन इडन गार्डन्सवर

Edited By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती