GT vs DC:दिल्ली कॅपिटल्सने गुजरातचा 6 गडी राखून पराभव केला

बुधवार, 17 एप्रिल 2024 (22:51 IST)
IPL 2024 चा 32 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याचवेळी ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने हंगामातील तिसरा विजय संपादन केला.दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातने दिल्लीसमोर 39 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात दिल्लीने हा सामना सहा गडी राखून जिंकला.
 
आयपीएल 2024 च्या 31 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्सचा सहा गडी राखून पराभव केला आणि गुणतालिकेत सहावे स्थान मिळवले. आता संघाच्या खात्यात सहा गुणांची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गुजरातचा संघ सातव्या स्थानावर पोहोचला आहे. दोन्ही संघांच्या खात्यात समान गुण आहेत. या सामन्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी मारक कामगिरी करत गुजरातला 89 धावांवर ऑलआउट केले. प्रत्युत्तरात दिल्लीने 67 चेंडू बाकी असताना सहा विकेट्स राखून लक्ष्य गाठले.
 
लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि जॅक फ्रेझर-मॅकगर्क यांच्यात पहिल्या विकेटसाठी 25 धावांची भागीदारी झाली. स्पेन्सर जॉन्सनने संघाला पहिला धक्का दिला. त्यांनी मॅकगर्कची शिकार केली. त्याला दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 20 धावा करता आल्या. तर शॉ केवळ सात धावा करू शकला. या सामन्यात अभिषेक पोरेलने 15, शाई होपने 19, ऋषभ पंतने 16 आणि सुमित कुमारने 9 धावा केल्या. पंत आणि सुमित नाबाद राहिले. गुजरातकडून संदीप वारियरने दोन बळी घेतले. तर स्पेन्सर जॉन्सन आणि राशिद खान यांना प्रत्येकी एक यश मिळाले.
 
दिल्ली कॅपिटल्सने 8.5 षटकांत 90 धावांचे लक्ष्य गाठून हंगामातील तिसरा विजय संपादन केला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात संघाचा 6 गडी राखून पराभव केला. दिल्लीकडून जेक फ्रेझर-मॅकगर्कने सर्वाधिक 20 धावा केल्या. तर शाई होपने 19 धावांचे योगदान दिले. ऋषभ पंत 16 धावा करून नाबाद परतला आणि अभिषेक पोरेलनेही 15 धावांचे योगदान दिले. 

Edited By- Priya Dixit  
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती