DC vs CSK: चेन्नईच्या नजरा विजयाच्या हॅट्ट्रिककडे असणार, प्लेइंग 11 जाणून घ्या

रविवार, 31 मार्च 2024 (16:40 IST)
आयपीएलच्या 17 व्या हंगामात सलग दोन सामने गमावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा दिवसाच्या दुसऱ्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) सामना होणार आहे. पहिल्या दोन सामन्यात दिल्लीने संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही.

या मोसमात आतापर्यंत अपराजित असलेल्या सीएसकेकडे विजयाची हॅट्ट्रिक साधण्याकडे लक्ष असेल. 
सामन्यापूर्वी पृथ्वीचा समावेश करण्याचे संकेत दिले आहेत.सामन्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पृथ्वीचा CSK विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याचे संकेत दिले आहेत. पाँटिंग म्हणाला, 'प्रशिक्षणादरम्यान आम्ही पृथ्वी शॉवर लक्ष ठेवले. जर तो सर्वांना प्रभावित करण्यात यशस्वी ठरला तर आम्ही त्याला CSK विरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याचा विचार करू शकतो.
 
दिल्ली कॅपिटल्स संघ रविवारी आयपीएल सामन्यात या मोसमात प्रथमच विजयाची नोंद करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, सीएसकेविरुद्ध दिल्लीचा रेकॉर्ड चांगला नसल्यामुळे त्याचा मार्ग सोपा होणार नाही. या स्पर्धेत उभय संघांमध्ये आतापर्यंत २९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी19 वेळा सीएसकेने विजय मिळवला आहे, तर दिल्लीने १० सामन्यांत विजयाची चव चाखली आहे.कर्णधार ऋषभ पंतला लयीत येण्याची गरज आहे. गेल्या दोन सामन्यांत त्याला मोठी खेळी खेळता आलेली नाही.
 
आयपीएलमध्ये आज दोन सामने होणार आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यानंतर सीएसके आणि दिल्ली यांच्यातील सामना रंगणार आहे
 
आयपीएल 2024 चा 13 वा सामना दिल्ली आणि चेन्नई यांच्यात रविवार, 31 मार्च रोजी विशाखापट्टणम येथील वायएस राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवरहोणार आहे
सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07.30 पासून खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी 07:00 वाजता होईल. 

Edited By- Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती