स्पॉट फिक्सिंग कसे झाले व सेठजी कोण आहे?

शुक्रवार, 17 मे 2013 (20:16 IST)
PTI
क्रिकेटच्या दुनियेत भूकंप आणणार्‍या स्पॉट फिक्सिंगचे धागेदोरे परदेशातही जुळले आहेत. सामनानिश्चितीपासून स्पॉट फिक्सिंगपर्यंत सट्टा खेळून अरबो-खरबो कमावणार्‍या काही लोकांचे नेटवर्क संपूर्ण जगभर पसरले आहे. 'सेठजी' याचा मास्टरमाइंड आहे.

कोन आहे कर्ताधर्ता..


पोलिसांनुसार सट्टेबाज व चंदीला दरम्यान झालेल्या चर्चेतून सेठजीचे नाव सामोरे आले आहे. दोघांमध्ये झालेली बातचीत खालीलप्रमाणे...

सट्टेबाज: हां मित्रा सांग.
चंदीला: पहिलं षट्क जाऊ दे, दूसर्‍या षट्कात सांभाळून घेईल.
सट्टेबाज: सिग्नल काय असेल?
चंदीला: टी शर्ट वर उचलून नंतर खाली घेईल व षट्क सुरू करेल.

चंदीला ने अंकित चव्हाणचे षट्क फिक्स करण्यासाठीही सट्टेबाजासोबत चर्चा केली. चव्हाणचे षट्क झाल्यानंतर चंदीलाने सट्टेबाजास विचारले, सेठजी खूश आहेत ना? यानंतर तो म्हणाला, पैसे अंकितला देऊ नका. तुमची चर्चा माझ्यासोबत झाली आहे तर पैसेही माझ्या मार्फतच येईल.

सूत्रांनुसार 'सेठजी'च स्पॉट फिक्सिंग कांडाचा मास्टरमाइंड असून तो सद्या आखाती देश किंवा दक्षिण आफ्रिकेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सेठजी सांगायचा तेच कोड वर्ड क्रिकेटपटू उपयोगात आणायचे. गुप्तचर संस्थांनुसार सेठजीचे धागेदोरे डी कंपनी सोबत जुळले आहेत.

सेठजींनी कोणते कोडवर्ड सांगितले होते..


जोड्याच्या लेस बांधणे: याचा अर्थ गोलंदाज टोलवण्यास सहज चेंडू टाकणार आहे.
परिणाम: बुकी सट्टा लावतो की चेंडू सीमापार जाईल.

लॉकेटचे चुंबन घेण्याचा अर्थ गोलंदाज नो बॉल करणार आहे.
परिणाम: बुकी सट्टा लावतो की पुढचा चेंडू नो बॉल असणार.

बॅट बदलण्याचा अर्थ विकेट पडणार आहे.
परिणाम: बुकी सट्टा लावतो की पुढील सहा चेंडूत विकेट पडणार आहे.

क्षेत्ररक्षणादरम्यान खेळाडूने सनग्लासेस घाण्याचा अर्थ फिक्सिंग सुरू झाली आहे. अशावेळी सट्टेबाज एकदुसर्‍यांच्या संपर्कात येतात.

फलंदाज हँड ग्लब्ज बदलतो म्हणजे अगोदर झालेल्या समझोत्यानुसार खेळण्यास तो राजी आहे.

सलमान आहे मास्टर माइंड?


पोलिस आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले होते की सलमाना नावाचा व्यक्ती दुबईतून ऑपरेट करत आहे. मार्च महिन्यात पोलिसांनी या व्यक्तीचा फोन टॅप करण्याची परवानगी मागितली होती.

मात्र सलमान त्याचे खरे नाव आहे किंवा नाही हे समजू शकले नाही. त्यांच्या फोनवरील संभाषणातून आयपीएल-6 मधील काही सामने निश्चित होणार असल्याचे समजले होते.

वेबदुनिया वर वाचा