युवराज सिंग एक मॅच विनर आहे. त्याच्यावर कर्णधार पदाचे ओझे असू नये. त्याने संघासाठी सामने जिंकून द्यावेत, अशीच अपेक्षा आहे, असे पुणे वॉरियर्सचे मुख्य प्रशिक्षक अॅलन डोनाल्ड यांनी म्हटले आहे.
पुणे वॉरियर्सच्या कर्णधार पदाविषयी डोनाल्ड म्हणाले, नेतृत्वासाठी अँजेलो मॅथ्यूज योग्य पर्याय आहे. आधी आपण रॉस टेलरचा विचार करीत होतो, परंतु तो केवळ 12 सामन्यांसाठी उपलब्ध आहे. त्यानंतर तो इंग्लंडला जाईल. सातत्याच्या दृष्टीने मॅथ्युजला जबाबदारी देणे चांगले आहे. मी त्याच्याशी चर्चा केली असून, तो नेतृत्वासाठी आतुर आहे.