दिल्ली डेयरडेविल्स संघ आपले नवीन घर छत्तीसगडच्या राजधानीमध्ये नवनिर्मित शहीद वीर नारायण सिंह अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आज बुधवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या ४४व्या सामन्यात सध्याचा चॅम्पियन कोलकाता नाइट राइर्ड्सचा सामना करेल.
आयपीएलच्या या सत्रातील उद्घाटन सामन्यात नाइट राइर्ड्सने डेयरडेविल्सला पराभूत केले होते आणि तेव्हापासून हा संघ लयाने असा भटकला की, नऊ सामन्यात आतापर्यंत फक्त दोन विजय प्राप्त करू शकला. पुणे वॉरियर्स इंडियावर मिळालेल्या अंतिम विजयासह तो घसरलेल्या संघातून आठव्या क्रमावर पोहचला.
माहेला जयवर्धनेच्या नेतृत्वात खेळलेल्या या संघाने वीर नारायण स्टेडियममध्ये खेळलेल्या आतापर्यंतच्या एकमात्र आयपीएल सामन्यात वॉरियर्सवर विजय नोंदवला होता. आता जेव्हा की, उद्या बुधवारी त्याचा सामना नाइट राइर्डसशी होणार असुन त्याची इच्छा विजयी क्रम सुरू ठेवून नाइट रायडर्सशी हिशोब बरोबर करण्याची आहे.
पुणे वॉरियर्सविरूद्ध डेयरडेविल्सचे प्रदर्शन खुप कौतुकास्पद नव्हते. वॉरियर्स संघ हा सामना जिंकू शकत होता परंतु आपल्या फलंदाजाच्या अपयशामुळे १५ धावांनी मागे राहिला. डेयरडेविल्स धोरणकारांना चांगल्या पद्धतीने माहित आहे की, त्याच्या आपल्या बळकटतेमुळे नव्हे तर वॉरियर्स कमकुवतमुळे त्याला विजय मिळाला.
अशात डेयरडेविल्स संघाला आपल्या धोरणावर विचारसह आपले वरिष्ठ खेळाडूंची साथ हवी असेल जे सतत अपयशी राहिले. डेविड वॉर्नरला सोडून एखाद्याचे प्रदर्शन निरंतर राहिले नाही. सहवागने मुंबई इंडियंसविरूद्ध विजयात महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती परंतु त्यानंतर त्याची बॅट शांत राहिली.
डेयरडेविल्स व नाइट राइर्ड्सचे धोरणकार हा विचार करत असतील की, दोन्ही संघाच्या प्रदर्शनात निरंतरतेचा अभाव राहिला आणि त्यांची इच्छा फायदा घेण्याची राहील. सध्याचा चॅम्पियन असूनही नाइट रायर्ड्स आतापर्यंत नऊपैकी तीन सामन्यात विजय नोंदवू शकला आणि सहामध्ये त्याला पराभव मिळाला.