खेळाडूंच्या चुकांमुळेच पराभव- धोनी

आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागल्याने चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूंमध्ये निराशा आली नसली तरी त्यांच्या चुकांमुळेच चेन्नईचा पराभव झाल्याचे मत किंग्जचा कर्णधार धोनीने व्यक्त केले आहे.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात काल अनेक उलटफेर झाले असून, रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू ने पहिल्या आयपीएलमध्ये विजेता ठरलेल्या राजस्थान रॉयल्सचा 75 धावांनी तर सुपर किंग्जला सचिनच्या मुंबई इंडियन्सने 19 धावांनी पराभूत केले होते.

चेन्नईचा सामना आता रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुशी होणार असून, या सामन्यात संघाचे पुनरागम होण्याची आशा धोनीने व्यक्त केली आहे.

वेबदुनिया वर वाचा