नवी दिल्ली. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंथ, अजीत चंदीला आणि अंकित चौहान यांना अटक केल्याने आयपीएलच्या झगमगाटामागील काळोख परत एकदा अधोरेखीत झाला.
* 9 मे रोजी पंजाब व राजस्थान दरम्यानचा सामना फिक्स होता.
* लॉकेट फिरवणे, टॉवेल काढणे, क्षेत्ररक्षण लावणे, घड्याळ फिरवणे यासारखे कोडवर्ड वापरण्यात येत होते.
* क्रिकेटपटूंना इशार्यात फिक्सिंगसाठी सूचना करण्यात येत होत्या.
* गोलंदाज मैदानातून इशारा कराचये.
* 15 मे रोजी मुंबई-राजस्थान दरम्यान खेळण्यात आलेल्या सामन्यात अंकित चव्हान ने दुसरे षट्क स्पॉट फिक्स केले होते.
* त्याने बुकीस वेळ देण्यासाठी वार्मअप केले.
* या षट्कात 16 किंवा जास्त धावा द्यायच्या होत्या.
* 9 मे रोजी मोहालीत झालेला सामनाही फिक्स होता.
* 5 मे रोजी पुणे-राजस्थान सामन्यात पोलिसांना फिक्सिंगची शंका होती.
* राजस्थान रॉयल्सचे 5, 9 व 15 मे रोजी खेळण्यात आलेले सामने अंकित चव्हाण, अजीत चंदीला व श्रीसंथ यांनी स्पॉट फिक्स केले होते. दिल्ली पोलिसांकडे बुकींसोबत बातचीत केल्याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे.
* 15 मे रोजी खेळण्यात आलेल्या सामन्यातील एक षट्क 60 लाख रूपयांत फिक्स