स्थानिक मैदानावर आपण चांगली कामगिरी करु असा विश्वास इंडियन प्रीमियल लीगमधील (आयपीएल) दुसर्या सत्रात प्रवेश करणारा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज युसूफ अब्दुल्ला याने सांगितले.
वेस्टइंडीजचा गोलंदाज जेरोम टेलर दुखापतग्रस्त झाल्यामुळे अब्दुल्लाचा समावेश किंग्स इलेवनचा संघात झाला. तो म्हणाला की, मला येथील विकेटची माहिती आहे. यामुळे त्याचा फायदा मला मिळेल. तसेच घरच्या प्रेक्षकांचा पाठिंबाही मिळेल.