सनराझर्स हैदराबाद पात्र; बंगळुरु आपीएल बाहेर

WD
येथे झालेल्या आयपीएल सामन्यात सनराझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाईट राडर्स संघाचा पाच गडी राखून पराभव केला. त्यामुळे सनराझर्स हैदराबाद संघ आयपीएलसाठी पात्र ठरला आहे. मात्र बंगळुरु संघाचे गुण कमी झाल्यामुळे तो आयपीएलमधून बाद झाला आहे.

कोलकाता नाईट राडर्स संघाने 20 षटकात 7 गडी गमावून 130 धावा केल्या. जिंकण्यासाठी 131 धावांचे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या सनराझर्स संघाने 18.5 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 132 धावा केल्या.

सात चेंडू राखून सनराझर्सने हा विजय संपादन केला आहे. हा सामना जिंकल्यामुळे सनराझर्स संघाची गुणसंख्या 20 झाली. त्यामुळे हा संघ क्रमवारीत चौथ्या स्थानावर आला आहे. तर 18 गुण संख्या असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

वेबदुनिया वर वाचा