श्रीशंतबद्दल घाईने निष्कर्ष काढू नये - थरूर

WD
श्रीशांतला अटक करण्यात आल्यानंतर मनुष्यबळ विकास खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री शशी थरूर यांनी दु:ख व्यक्त केले असून, श्रीशांतविरुद्ध कोणीही लगेच घाईने निष्कर्ष काढू नयेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज श्रीशांत याच्यासह राजस्थान रॉयल्समधील त्याचे दोन सहकारी अजित चंडिला व अंकित चव्हाण यांना स्पॉट फिक्सिंगच्या आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. ‘श्रीमंत क्रीडा स्पर्धा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘आयपीएल’मधील आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पेचप्रसंग ठरेल, अशी चर्चा आहे.

वेबदुनिया वर वाचा