कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (KKRvsRCB) यांच्यातील 6 एप्रिल रोजी झालेला सामना खूपच मजेशीर होता. सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. संघाच्या विजयावर शाहरुख खूप उत्साही दिसत होता. तो विराटला भेटण्यासाठी स्टेडियमवर गेला होता. यानंतर किंग खानने विराटला झूम जो पठाण (Shahrukh Khan Virat Kohli Pathan Dance) या गाण्यावर डान्स करायला शिकवला. शाहरुखने एकामागून एक गाण्याचे स्टेप्स केले आणि विराटने त्याच्या मागे फॉलो केले. या दोन्ही दिग्गजांसह चाहत्यांनी या नृत्याचा आनंद लुटला.