आयपीएल 2023 च्या अंतिम फेरीत आज गतविजेत्या गुजरात टायटन्सचा सामना चार वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जशी होत आहे. हा सामना रविवारीच होणार होता. मात्र, 28 मेचा दिवस पावसाने वाहून गेला. आता हा सामना आज राखीव दिवशी खेळला जात आहे. रविवारी पावसामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. सोमवारी चेन्नईचा कर्णधार धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत 4 गडी गमावून 214 धावा केल्या.
अहमदाबादमधील चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस थांबला आहे. सामना लवकरच सुरू होऊ शकतो. षटके कापली जाण्याची शक्यता नाही. कव्हर काढले आहेत. सुपर-सोपर्स त्यांचे काम करत आहेत. मात्र, काही ठिकाणी जमिनीवर पाणी साचले. ते सुकवण्याचे काम केले जात आहे. अशा परिस्थितीत पूर्ण 20 षटकांचा सामना होऊ शकतो. गुजरातने चेन्नईसमोर 215 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. रात्री 10.45 वाजता पंच पाहणी करतील.