जोफ्रा आर्चर यांना मुंबई इंडियन्सने मोठ्या रकमेत खरेदी केले

रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (17:02 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या 15 व्या हंगामाच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर जोरदार बोली लावली आणि त्यांना मुंबई इंडियन्स मध्ये सामील केले. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे ते  आयपीएल 2022 मध्ये खेळू शकणार नाही आणि आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने आर्चरचा आपल्या संघात समावेश केला आहे. जरी  जोफ्रा आर्चरने याआधी मेगा लिलावासाठी त्यांचे नाव दिले नव्हते, परंतु नंतर त्यांनी यासाठी नोंदणी केली होती आणि त्यांच्यावरही बोली लावण्यात आली होती. 
 
IPL 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध बोली लावून 8 कोटी रुपये मोजले. ते आयपीएल 2022 मध्ये खेळू शकणार नाही. त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे कारण त्यांना इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेटमध्ये परतायचे आहे आणि त्यांना  फिटनेसची देखील काळजी घ्यायची आहे. आयपीएलच्या तीन हंगामांसाठी मेगा लिलाव मानला जातो. अशा परिस्थितीत मुंबई इंडियन्सने त्यांना आपल्या संघात जोडले असून ते पुढील दोन वर्षे संघासोबत असेल. 
 
मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आहे आणि त्यामागील कारण म्हणजे फ्रँचायझी केवळ एका हंगामासाठीच नव्हे तर येत्या काही हंगामांसाठीही विचारपूर्वक पावले उचलते. जोफ्रा आर्चरवर 8 कोटी खर्च करणे हा एक मोठा निर्णय आहे आणि  ते  देखील अशा वेळी जेव्हा सर्वांना माहित आहे की ते  यावर्षी उपलब्ध होणार नाही. मात्र, मुंबई इंडियन्सची ही मानसिकता त्यांना सर्वांपेक्षा वेगळी बनवते. असे असून ही मुंबई इंडियन्स ने जोफ्रा आर्चर ला मोठ्या रकमेत खरेदी केले 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती