रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सहाव्या सामन्यात आमनेसामने येतील. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून हा सामना रंगणार आहे. 15 व्या मोसमातील दोन्ही संघांचा हा दुसरा सामना आहे. बंगळुरूची कमान फाफ डू प्लेसिसकडे आहे. आरसीबीला पहिल्याच सामन्यात पंजाब किंग्जकडून 5 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता. आरसीबीने 2 गडी गमावून 205 धावा केल्या होत्या, ज्याचा बचाव गोलंदाजांना करता आला नाही.
बंगळुरूची सुरुवात चांगली झाली नसेल पण आता ते विजयी मार्गावर परतण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील. आरसीबी आणि केकेआर यांच्यातील आकडेवारी पाहता बंगळुरूचा वरचष्मा आहे. दोन्ही संघांनी आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण २९ सामने खेळले आहेत. यादरम्यान आरसीबीने 13 सामन्यात तर कोलकाताने 16 सामन्यात विजयी पताका फडकवली आहे. गेल्या मोसमात दोघांमध्ये तीनदा सामना झाला, ज्यामध्ये केकेआरने दोन आणि आरसीबीने एक जिंकला. बंगळुरू कोणत्या प्लेइंग इलेव्हन सोबत मैदानात उतरू शकते
RCB ची प्लेइंग 11
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), शर्फीन रदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, डेव्हिड विली, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल.