IPL 2022 Final: आयपीएल फायनलच्या वेळापत्रकात बदल

शुक्रवार, 20 मे 2022 (14:25 IST)
आयपीएलचा 15वा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (22 मे) साखळी फेरीतील 70 सामने पूर्ण होतील. यानंतर अहमदाबाद आणि कोलकाता येथे प्लेऑफचे आयोजन करण्यात येणार आहे. क्वालिफायर 1 आणि एलिमिनेटर सामने 24 आणि 25 मे रोजी कोलकातामध्ये खेळवले जातील. त्यानंतर 27 आणि 29 मे रोजी अनुक्रमे क्वालिफायर-2 आणि फायनल होईल.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) IPL फायनलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा विचार करत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (29 मे) होणारा अंतिम सामना साडेसात वाजता सुरू होणार नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रात्री आठ वाजल्यापासून विजेतेपदाचा सामना सुरू होऊ शकतो. समारोप समारंभ लक्षात घेऊन बीसीसीआय हा निर्णय घेऊ शकते.
 
फायनलपूर्वी नरेंद्र मोदी स्टेडियमवर समारोप सोहळा होणार आहे. यामध्ये बॉलिवूडचे अनेक मोठे स्टार्स दिसणार आहेत. सायंकाळी साडेसहा वाजता समारोप सोहळा सुरू होणार आहे. हे किमान 50 मिनिटे टिकेल. अशा स्थितीत नाणेफेक साडेसात वाजता होणार आहे. 30 मिनिटांनंतर सामना सुरू होईल.
 
बोर्ड पुढच्या हंगामापासून आयपीएल सामन्यांच्या वेळेत बदल करण्याचा विचार करत असल्याची चर्चा असताना ही बातमी समोर आली आहे. पुढील वर्षीपासून दुपारचे सामने आता दुपारी 3 ऐवजी 4 वाजता सुरू होतील. त्याच वेळी, संध्याकाळी 7:30 वाजताचा सामना रात्री 8 वाजता सुरू होऊ शकतो. पहिल्या 10 सीझनमध्ये (2008-17) सुरू होणाऱ्या सामन्याची ही वेळ होती.
यावर्षीही 26 मार्चला होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी उद्घाटन सोहळा झाला नाही. समारोप समारंभ आयोजित करण्याचा निर्णय नंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती