रोहित शर्माच्या बुटांची आयपीएलमध्ये चर्चा

गुरूवार, 15 एप्रिल 2021 (13:14 IST)
Twitter
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याच्या बुटांवरून देत असलेल्या संदेशामुळे चर्चेमध्ये आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात त्याने लुप्त होत असलेल्या गेंड्यांच्या  प्रजाती वाचवण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यानंतर कोलकाताविरुद्धच्या सामन्यातही त्याने खास संदेश दिला आहे.
 
चेन्नईच्या चिदम्बरम मैदानात कोलकाता विरुद्धचा सामना मुंबईने 10 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित ने या सामन्यात 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. मात्र, त्याच्या बुटावरील संदेशाने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात त्याच्या बुटावर निळ्या रंगाच्या पाण्यात पोहत असलेल्या कासवाचे चित्र होते. यातून प्लास्टिमुक्त समुद्र हा संदेश त्याने दिला.
 
बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात ही त्याने खास संदेश दिला होता. एक शिंग असलेली गेंड्याच्या प्रजाती आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या गेंड्याच्या प्रजाती वाचवण्यासाठी त्याने पुढाकार घेतला आहे. बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात रोहितने घातलेल्या बुटावर एक शिंग असलेल्या गेंड्याचा फोटो होता. तसेच गेंड्यांना वाचवा, असा संदेशही त्यावर लिहिण्यात आला होता. रोहितने ही माहिती आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिली होती.
मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना सनराइजर्स हैदराबादसोबत आहे. हा सामना 17 एप्रिलला खेळला जाणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात काय संदेश देतो याकडे क्रीडारसिकांचे लक्ष लागले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती