रविवारी खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या IPL सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 60 धावांनी पराभव केला आहे. इयन मॉर्गनच्या नाबाद 68 धावांच्या जोरावर कोलकाताने 20 ओव्हरमध्ये 7 गडी गमावून 191 धावा केल्या होत्या. राजस्थानला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 131 धावाच करता आल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 35 धावा केल्या. राहुल तेवतियाने 31 आणि श्रेयस गोपालने नाबाद 23 धावा केल्या. मॉर्गनने 35 बॉलमध्ये 5 फोर आमि 6 सिक्स मारले. राहुल त्रिपाठीने 39 धावा केल्या. शुभमन गिलने 36 धावा केल्या. आंद्रे रसेलने 25 धावा केल्या. राहुल तेवतियाने तीन विकेट घेतल्या.