ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पीपीई किट परिधान करून आले दुबईत, राजस्थान संघाला मोठा दिलासा

शनिवार, 19 सप्टेंबर 2020 (08:46 IST)
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू होण्याच्या एक दिवस आधी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू पीपीई किट परिधान करून दुबई विमानतळावर उतरले. याआधी या क्रिकेटर्सच्या आगमनाबद्दल शंका होती. सुरुवातीच्या सामन्यात हे क्रिकेटपटू खेळणार की नाही याबाबत शंका होती. या क्रिकेटर्सचे आगमनामुळे राजस्थान संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. 
 
इंग्लंडमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सीरीज संपल्यानंतर या खेळाडूंना 'बायो सिक्योर बबल' मधून सर्व क्रिकेटपटूंना थेट दुबईला आणण्यात आले आहे. वाटेत कोणत्याही कारणास्तव कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व क्रिकेटपटूंनी पीपीई किट घातले होते. पण पीपीई किटमुळे खेळाडूंची ओळख पटविणेही कठीण होते. यावेळी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर, अष्टपैलू टॉम कुरैन  आणि एंड्रयू टाई हे चार खेळाडू दुबईत दाखल झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती