#IPL2019 : राजस्थानचे पंजाबला आज कडवे आव्हान

सोमवार, 25 मार्च 2019 (09:49 IST)
आयपीएलच्या पहिल्यामोसमाचे विजेतेपद पटकावल्यानंतर आतापर्यंत विजेतेपदापासून दुर असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या संघात माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने पुनरागमन केले असले तरी यंदा कर्णधारपद पुन्हा अजिंक्‍य रहाणेकडे असणार असून गत हंगामातील खराब कामगिरीतून धडा घेत यंदा विजेतेपद पटकावण्याच्या उद्देशाने राजस्थानचा संघ पुन्हा मैदानात उतरण्यास तयार आहे.  आयपीएलच्या पहिल्या मोसमापासून धडाकेबाज कामगिरीकरत चांगली सुरूवात केल्यानंतर मधल्या काळात पुन्हा खराब कामगिरी करुन जवळपास सर्वच मोसमात अखेरच्या चार स्थानांवरच समाधान मानणाऱ्या पंजाबच्या संघाने गत हंगामातही अशीच चांगली कामगिरी नोंदवल्यानंतर यंदाही त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
 
प्रतिस्पर्धी संघ –
 
किंग्ज एलेव्हन पंजाब – रविचंद्रन अश्‍विन (कर्णधार), लोकेश राहुल, ख्रिस गेल, अँड्य्रू टाय, मयंक अग्रवाल, अंकित राजपूत, मुजीब उर रेहमान, करुण नायर, डेव्हिड मिलर, सॅम करन, वरुण चक्रवर्ती, निकोलस पूरन, मोहम्मद शमी, प्रभसिमरन सिंह, अग्निवेश अयची, सरफराज खान, अर्शदीप सिंह, दर्शन नलकंडे, एम अश्‍विन, हार्डस विल्युनख, हरप्रीत ब्रार.
 
राजस्थान रॉयल्स – अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, कृष्णप्पा गौतम, संजू सॅमसन, श्रेयस गोपाल, आर्यमान बिर्ला, एस मिधुन, प्रशांत चोपड़ा, स्टुअर्ट बिन्नी, राहुल त्रिपाठी, बेन स्टोक्‍स, स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, इश सोढी, धवल कुलकर्णी आणि महिपाल लोमरोर, जयदेव उनाडकट, वरुण एरॉन, ओशेन थॉमस, शशांक सिंह, लिआम लिविंगस्टोन, शुभम रांजणे, मनन वोहरा, रियान प्रयाग, एस्टन टर्नर.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती