रेझ्युमे लिहिताना या नियमाचे अनुसरणं करा, निश्चितच नोकरी मिळेल
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (10:50 IST)
एखादी चांगली आणि आवडती नोकरी मिळविण्यासाठी रेझ्युमे ही पहिली पायरी आहे असं म्हटलं तर हे चुकीचे ठरणार नाही. कुठल्याही कंपनीत नोकरीसाठी अर्ज करताना आपण सर्व जण आपले रेझ्युमे देतो. त्या आधारेच आपणास नोकरीच्या मुलाखतीस बोलवणे येतील किंवा नाही येणारं हे ठरतं. या अर्थाने रेझ्युमे हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे, ज्याला अजिबात सहजपणे घेऊ नये. बहुतेकदा असे घडतं की कमी अनुभवांचा लोकांना देखील एखादी चांगली नोकरी मिळते आणि याचे कारणं असत त्यांचे अधिक चांगल्या प्रकारे रेझ्युमे लिहिणं. चला तर मग आज आम्ही आपल्याला अशाच काही नियमांबद्दल सांगत आहोत, ज्यांना आपण आपल्या रेझ्युमे लिहिताना पाळायलाच हवे.
* रेझ्युमे फक्त एकाच पृष्ठावर द्यावा -
करिअर तज्ज्ञ म्हणतात की बऱ्याच कंपन्यांमध्ये नोकरीवर घेणारे मॅनेजर किंवा व्यवस्थापक कोणाच्याही रेझ्युमेसाठी एका मिनिटा पेक्षा जास्त वेळ देत नाही. कदाचित ते रेझ्युमेचे पान देखील पालटून बघणार नाही. म्हणून प्रयत्न करावे की आपले रेझ्युमे छोटे आणि आकर्षक असावे. लक्षात ठेवा की रेझ्युमे आपण केलेल्या प्रत्येक कामाचे प्रदर्शन करण्यासाठी नव्हे, तर हे दाखविण्यासाठी आहे की आपल्या कडे कामाची पार्श्व भूमी, कौशल्य आणि अनुभव आहे.
* रेझ्युमे मध्ये चुका करू नये -
ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ज्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. करिअर तज्ज्ञाच्या म्हणण्यानुसार नेहमी रेझ्युमे लिहून झाल्यावर बऱ्याचदा तपासून बघावे. आपल्या रेझ्युमे मध्ये शब्दलेखन किंवा व्याकरणाच्या काही चुका तर नाही न याची खबरदारी घ्यावी. या व्यतिरिक्त, आपण रेझ्युमे मध्ये लिहिलेल्या वाक्यांचा टेन्स म्हणजे काळ तपासून बघा. अशा चुका असलेल्या रेझ्युमेला एचआर सुरुवातीलाच नाकारतात.
* रेझ्युमे पीडीएफ मध्ये पाठवा -
करिअर तज्ज्ञ म्हणतात की आपल्याला आपले रेझ्युमेला वर्ड किंवा दस्ताऐवजऐवजी पीडीएफच्या रूपात सेव्ह करून पाठवावे. या मुळे हे सुनिश्चित केले जाते की हायरिंग मॅनेजर आपल्या रेझ्युमेला तसेच बघतात, जसे आपण त्याला सेव्ह केले आहेत. जर आपण आपल्या रेझ्युमेला एखाद्या दुसऱ्या मार्गाने पाठवले तर, कदाचित त्याची शैली, स्वरूप आणि फॉन्ट आपल्या संगणकापासून थोडा वेगळा दिसत असेल.
* वाचण्यात सोपे असावे -
करिअर तज्ज्ञाच्या मते, एका पानाचे रेझ्युमे लिहिण्याचा अर्थ असा नाही की आपण त्याचे फॉन्ट खूपच लहान करावे आणि त्यानंतर एचआर हेड साठी रेझ्युमे वाचणे अवघड होऊन जाईल. नेहमी हे सुनिश्चित करा की रेझ्युमे वाचण्यात सोपे असावे. फॉन्टचा आकार कधीही खूप लहान किंवा खूप मोठा ठेवू नये.
* रेझ्युमे नेहमी व्यवस्थित आणि प्रभावी असावे-
करिअर तज्ज्ञ सांगतात की हायरिंग मॅनेजर सहसा आपल्या रेझ्युमे बघण्यात फक्त सहा सेकंद घालवतात. म्हणून आपण आपला रेझ्युमे सुस्पष्ट आणि वाचण्यास सुलभ असणारे बनवावे. प्रत्येक विभाग ठळक असावे आणि प्रत्येक नोकरीचे शीर्षक ठळक असावे. रेझ्युमेला सोपे आणि प्रभावी बनविण्यासाठी टेम्पलेट वापरावे.