पाकिस्तानचा 8 महिन्याचा मुलगा रयान आपल्या 2 वर्ष 4 महिने मोठी बहीण जीनियाला बोन मॅरो दान करणारा सर्वात लहान वयाचा डोनर बनला आहे. जीनियाला एक दुर्लभ आजार हीमोफैगोसिटिक लिम्फोहिस्टिओसाइटोसिस आहे. या आजारात तिचे बोन मॅरो काही असामान्य पेशींचे निर्माण करत होते ज्यामुळे सामान्य पेशींना धोका पोहचत होता. याच्या उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्ससप्लांट गरजेचं होतं.