वुहान शहर पुन्हा पूर्वपदावर, शाळा, अंगणवाड्या सुरू होणार

शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (22:38 IST)
कोरोनाचा सर्वप्रथम उद्रेक झालेलं चीनमधील वुहान शहर पुन्हा पूर्वपदावर येऊ लागलं आहे. वुहानमधून कोरोना नष्ट झाला आहे. आता वुहानमधील शाळा आणि बालवाडीचे वर्गही मंगळवारपासून सुरू होणार आहे. 
 
वुहानमधील स्थानिक प्रशासनानं शहरातील शाळा मंगळवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. करोनाचा प्रचंड झळ बसलेलं वुहान आता पूर्वपदावर येत असून, सोमवारपासून वुहान विद्यापीठ सुरू होणार आहे. तर मंगळवारपासून सर्व शाळा आणि अंगणवाड्याही सुरू करण्यात येणार आहे. वुहानमधील २ हजार ८४२ शैक्षणिक संस्थांचे दरवाजे मंगळवारी खुले होणार असून, १.४ मिलियन विद्यार्थी शाळेत परतणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती