आत्ता पर्यन्त आपण बायकांची भांडणे रस्त्यावर, बस मध्ये , लोकल मध्ये होतांना ऐकले आहे आणि बघितले आहे. पण चक्क विमानात दोन महिला जागेवरून भांडत असल्याचे प्रथमच ऐकू आले आहे. दोन्ही महिलांना चक्क विमानाची आपत्कालीन लँडिंग करून बाहेर काढण्यात आले. हे घडले आहे. फिलाडेल्फियाहून लास वेगासला जाणाऱ्या फ्रंटियर एअरलाइन्सच्या फ्लाइटला या विमानात दोन महिला प्रवाशांमध्ये भांडण झाल्यानंतर डेन्व्हरमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पाडले. एका जागेवरून दोन महिलांमध्ये वाद सुरू झाल्याने हाणामारी सुरू झाली. वाद इतका वाढला की महिलांनी एकमेकांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका फ्लाइट अटेंडंटने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, परंतु महिला त्याला न जुमानत भांडत राहिल्या. त्यापैकी एका महिलेने पुरुष प्रवाशाच्या डोक्यावर मारल्याचा आरोप आहे. यानंतर फ्लाइट अटेंडंटने इमर्जन्सी लँडिंग करण्यास सांगितले आणि विमान डेन्व्हरकडे वळवण्यात आले. विमान डेन्व्हरला वळवण्याआधी सुमारे 15 मिनिटे ही झुंज चालली.
दोन्ही महिलांना विमानातून उतरवून पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांवर बेशिस्त वर्तनाचा आरोप ठेवण्यात आला होता. 22 वर्षीय अॅशले स्मिथ आणि 23 वर्षीय जेसिका जोन्स अशी या दोन महिलांची नावे आहेत. जामीन दिल्यानंतर स्मिथ आणि जोन्स दोघांचीही तुरुंगातून सुटका झाली. डेन्व्हर पोलिस विभागाकडून या घटनेचा अद्याप तपास करत आहे.