लोक कुत्री मांजर पाळतात आणि त्यांना आपल्या कुटुंबियांच्या सदस्यांप्रमाणे ठेवतात.प्राणी देखील माणसांची भाषा समजू लागतात. त्यांना काय हवं काय नको ते सांगतात. आता पाळीव प्राणी काय म्हणत आहे त्यांना काय पाहिजे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. मांजर च्या म्याऊ म्याऊ करण्याचा काय अर्थ आहे. किंवा कुत्र्याचा भूंकण्याचा काय अर्थ आहे ते समजू शकाल. अलीकडील काही शास्त्रज्ञ संशोधन करत असून प्राण्यांची भाषा समजण्यासाठी AI आर्टिफिशल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
AI चा वापर पाळीव प्राण्यांची देहबोली, हावभाव आणि त्यांचे वर्तन जाणून घेण्यासाठी केला जाऊ शकतो. AI चा वापर करून प्राण्यांच्या कानाच्या स्थिती वरून त्यांची भावना समजता येऊ शकेल. शास्त्रज्ञ मांजरी, कुत्री आणि घोड्यांच्या चेहऱ्यावरील त्यांची भावस्थितीचा शोध घेण्यासाठी त्यांना काय वेदना होत आहे. त्यांना वेदना कशामुळे होत आहे हे देखील समजून घेण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
प्राणी एकमेकांशी संवाद साधताना त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव सुमारे 276 हावभाव दर्शवतात हे भावभाव एखाद्या माणसाने दाखवलेल्या चेहऱ्याच्या हावभावाच्या संख्येपेक्षा खूप जास्त आहे. हे मानवी चेहऱ्याच्या हावभावापेक्षा वेगळे असू शकतात. अशा प्रकारे आता आपण आपल्या पाळीव प्राणी कशा प्रकारे एकमेकांशी संवाद साधतात हे समजून घेण्यास AI तंत्रज्ञान मदत करू शकते.