गजब! या शहरात मृत्यूची मनाई आहे ...

सोमवार, 10 एप्रिल 2017 (21:08 IST)
तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल की नार्वेच्या लॉन्गेयरबेन शहरात माणसांच्या मृत्यूवर प्रतिबंध लागलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला विचित्र वाटू शकते पण तुम्हाला या प्रतिबंधाच्या मागचे कारण कळेल तेव्हा तुम्ही सुद्धा या प्रतिबंधाचा विरोध करणार नाही.  
 
नार्वेच्या या दोन हजाराची आबादी असणार्‍या शहरात रक्त गोठणारी थंडी असते. येथे राहणारे लोक या तर टूरिस्ट असतात किंवा शोधकर्ता वैज्ञानिक. चारीकडे फक्त बर्फच बर्फ दिसतो आणि हेच कारण आहे की येथे ट्रांसपोर्टेशनसाठी फक्त स्नो स्कूटरचा वापर करण्यात येतो.  
 
येथे वर्षातून चार महिने सूर्याचे दर्शन होत नाही आणि 24 तास रात्रच असते. शहरात एक फारच लहान कब्रिस्तान आहे ज्यात मागच्या 70 वर्षांमध्ये कोणाला ही दफनावले नाही आहे. महत्त्वाचे म्हणजे जास्त थंडी आणि बर्फात दबून राहिल्यामुळे येथे लाशी जमिनीत नष्टही होत नाही आणि खराब देखील होत नाही.
 
बर्‍याच वर्षांआधी वैज्ञानिकांनी येथील कब्रिस्तानातून एक डेड बॉडीचे टिशू सँपल म्हणून घेतले होते आणि त्याची चाचणी केल्यानंतर त्यात अजूनही इन्फ्लुएंजाचे वायरस आढळले. यानंतरच येथे 'नो डेथ' पालिसी लागू करण्यात आली. जर येथे कोणी गंभीर आजार होतो तर त्याला प्लेन किंवा शिपमध्ये बसवून नॉर्वेच्या दुसर्‍या भागात पाठवण्यात येते. 

वेबदुनिया वर वाचा