मद्यसम्राट विजय मल्ल्या याचे प्रत्यार्पण आणखी लांबणीवर पडले आहे. गुरुवारी याप्रकरणी लंडनमधील वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर झालेली सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे याप्रकरणी कोणताही निर्णय झाला नाही. दरम्यान, कोर्टाने मल्ल्याला दिलासा दिला असून त्याच्या जामीनात २ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
भारत सरकारने मल्ल्याविरोधात सादर केलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेत युक्तीवाद करण्याची मागणी त्याच्या वकीलांनी वेस्टमिनस्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात केली होती. त्यासाठी प्रत्यक्ष मल्ल्यादेखील कोर्टात हजर होता. मात्र, यावेळी बचाव पक्षाचा युक्तीवाद पूर्ण होऊ शकला नाही. दरम्यान, त्यांनी भारत सरकारची याचिका रद्द करण्याची मागणी कोर्टात केली. मल्ल्या भारतील बँकांना सुमारे ९ हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेला आहे.