आता इंग्लंडमध्ये चक्क शाकाहारी मच्छीही बनवण्यात आली आहेत. यात खराखुरा मासा नसून तो पूर्णपणे शाकाहारी खाद्यपदार्थ आहे. लंडनमधील डॅनियल सॅटन या हॉटेलने शाकाहारी लोकांसाठी ही खास ‘शाकाहारी मच्छी’ तयार केली आहे. केळफूल आणि समुद्री वनस्पतीपासून ही मच्छि बनवण्यात आली आहे. या शाकाहारी मच्छीची किंमत 5.50 पौंड म्हणजेच 517 रुपये आहे. या मच्छीबरोबर जपानी बटाट्याच्या अर्कात केळफूल आणि समुद्री वनस्पती टाकून त्याची कोळंबीही बनवली जात आहे. यामुळे शाकाहारी लोकांना मांसाहार केल्याचा ‘फिल’ दिला जात आहे.